पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर नगरपरिषद निवडणूक भाजपा नगरसेवक व नगराध्यक्ष उमेदवार यांच्या कॉर्नर सभेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विरोधकांना विकासकामांचा लेखा जोखा सुनावल्याचे पाहवयास मिळाले.
यावेळी प्रभाग क्रमांक १मधील उमेदवार लखन जन्बू चौगुले, सौ अर्चना शिंदे, प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार मयूर भिंगे, प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवार तेजश्री पानकर, सौ श्वेता डोंबे आदी उपस्थित होते.
निवडणुक पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे विविध ठिकाणी भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना परिचारक त्यांनी नगरपरिषद कारभार चालवताना पाणी,घनकचरा, लाईट बिल, स्वच्छता, रस्ता डागडुजी आदी बाबीं वर होणारा खर्च असणारे उत्पन्न तसेच राज्य शासनाच्या वतीने नगरपरिषद साठी निधी तो मंजूर करून घेतानाच्या अडीअडचणी यातुन गेल्या ४० वर्षी पुर्वीचे पंढरपूरची लोकसंख्या आणि आज काय पंढरपूर शहराकडे आहे याचा लेखाजोखा त्यांनी मांडला जनतेसमोर मांडला.
या निवडणुकीत भाजपाचे युवा उमेदवार रिंगणात उतरले आहेत त्यांना योग्य सहकार्य व मार्गदर्शन करताना पंढरपूरच्या नगरपरिषद कारभाराचा अभ्यास करण्याचा तसेच सक्षम नगरसेवक म्हणून काम करत असताना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.तसेच आजपर्यंत अनेक प्रकारच्या शासकीय योजनेच्या माध्यमातून किती निधी आणला कोण कोणती कामे शहरासाठी केली याची माहिती त्यांनी दिली.
शहरातील झालेली विकासकामे व प्रस्तावित विकास कामे जनते समोर मांडताना पंढरपूरचा विकासासाठी पंढरपूरच्या नागरिकांनचे पाठबळ असणं आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


