पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मागणीप्रमाणे प्रत्येक संकष्टी चतुर्थी दिवशी "श्रीक्षेत्र पखालपूर" येथे जाण्यासाठी पंढरपूर एसटी आगारातून सकाळी ७ पासून एसटी बसेसची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
शनिवार दिनांक ८/११/२०२५ रोजी "संकष्टी चतुर्थी" निमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी पंढरपूर आगाराने एसटीची सेवा उपलब्ध करून दिली आहे.तरी प्रवासी बांधवांनी,भाविकांनी एसटी बसने प्रवास करून श्रीक्षेत्र पखालपूर येथील श्रीगणेशाचे दर्शन घ्यावे असे आवाहन आगार प्रमुख योगेश लिंगायत, स्थानक प्रमुख अंकुश सरगर,अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत सहसचिव दीपक इरकल, सदस्य विनोद भरते, सुभाष सरदेशमुख,जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास, जिल्हा सचिव सुहास निकते,उपाध्यक्ष विनय उपाध्ये,पांडुरंग अल्लापूरकर,तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,महेश भोसले,सदस्य सागर शिंदे,अंकुश वाघमारे,संभाजी लंगोटे,आझाद अल्लापूरकर प्रशांत माळवदे,सतिश निपाणकर यांनी केले आहे.एसटी बसेस जुने एसटी स्टँड येथून सुटतील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.

