पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अरिहंत पब्लिक स्कुल मधे मधुमेहविषयक नुकत्याच झालेल्या व्याख्यानाला जोडूनच क्लब चेअरमन डायबेटीस स्क्रीनिंग लायन डॉ. सूरज तंटक यांनी सर्व शिक्षकांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये ब्लड प्रेशर, SPO2,व शिक्षकांच्या इतर तक्रारींच्या अनुषंगाने शारीरिक तपासणी केली. त्यांनी सुचवल्या प्रमाणे HB, BSL, HbA1C, Lipid Profile , CBC व Thyroid या तपासण्यासाठी सॅम्पल घेतली. रिपोर्ट्स मिळाल्यानंतर दोष आढळून आल्यास त्यावर डॉक्टर मोफत मार्गदर्शन करणार आहेत. तपासणीसाठी पूर्व सूचनेनुसार सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी फास्टिंग केलं होतं.
80 शिक्षक व 20 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
संस्थाचालक सचिव मा. श्री. उज्वल दोशी व प्रिन्सिपल प्रा. बहिरट मॅडम क्लब प्रशासक ला. ललिता कोळवले व सचिवा ला. कृत्तांजली सावंत उपस्थित होत्या.

