ठाणे प्रतिनिधी -गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
भारतीय संविधान दिन. सन २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान भारतीय संसदेत सादर झाले. त्या दिवसापासुन आजतागायत हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर साजरा होतो.
आज हा गौरवशाली ७६ वा संविधान वर्धापन दिन भारत सरकार नीती आयोग संचालित भारतीय मानवधिकार असोसिएशन संघटनेतर्फे विविध राज्यात जल्लोषात साजरा झाला. याच संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संघटकानी ठाणे जिल्हा कोर्ट येथे हा संविधान दिन गौरव कार्यक्रम आयोजित केला गेला.
याप्रसंगी सर्व उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी घटनाकार भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून संविधान शपथ घेतली. यानंतर सर्व सदस्यांनी भारतीय राज्यघटनेविषयी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.
प्रथम संघटनेच्या राज्यप्रशासकीय संरक्षण विभाग प्रमुख मिस्टर इम्रान बागवान (सध्या मुख्याध्यापक अंजुमन इस्लाम हायस्कूल घाटकोपर मुंबई येथे कार्यरत) यांनी यासंदर्भात बोलताना भारतीय राज्य घटनेतील कर्तव्य व जबाबदारी त्यांचे महत्त्व विषद केले. तर याच संघटनेच्या राज्य प्रशासकीय संरक्षण उपप्रमुख सौ. आरती कांबळे (सध्या समन्वयक सायबर क्राईम पोलीस स्टेशन ठाणे येथे कार्यरत) यांनी महिला व बालविकास संरक्षण संदर्भात घटनेला अनुसरून विशेष माहिती दिली. तसेच सौ. तन्वी चाळके पोलीस संरक्षण कोकण विभाग प्रमुख यांनी सर्वसामान्यांना जाणवण्यार्या समस्या व याउपर कायदेशीर समाधान यांचे सविस्तर विश्लेषण केले.
मिंस्टर हुसैन मण्यार सामाजिक प्रमुख संरक्षण कोकण विभाग यांनी संविधान हा लोकशाहीचा श्वास व जनतेचा विश्वास आहे असे म्हटले. या घटनेतील मुलभूत बाबी जपण्यासाठी लोकशाहीचे स्तंभ व लाभार्थी यामध्ये आपली भारतीय मानवधिकार संघटना ही दुवा आहे, म्हणूनच हे माध्यम अधिक घट्ट झाले पाहिजे. तर सौ. सोनावणे उपप्रमुख सामाजिक संरक्षण कोकण विभाग यांनी घटनेतील विशेष तरतुदी व मानवी मुल्य यावर उत्तम भाष्य केले. जनसामान्यांना भेडसावण्यार्या प्रत्येक समस्यांवर उत्तर संविधानात आहे. फक्त ते शोधण्यासाठी त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे.
याच संघटनेच्या राज्य आर्थिक विभाग प्रमुख पदी नुकतीच गजानन फडकले यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांनी ही आपले मनोगत याद्वारे व्यक्त केले. ते म्हणाले आपल्या देशात घटनेनुसार अनेक कायदे व नियम बनवले गेले आहेत. परंतु योग्य अंमलबजावणी अभावी या कायद्याचा लाभ दुर्बल शोषित वंचिताना मिळत नाही, किंबहुना या ज्ञान माहिती अभावी त्यांचे शोषण होते. तसेच कधीकधी ते शासन प्रशासन बलदंडापुढे हतबल ठरते. अशावेळी त्यांना न्याय देण्यासाठी सर्व जागरूक नागरिक सामाजिक संस्था व NGO यांनी पुढे आले पाहिजे.
भारतीय मानवधिकार असोसिएशन यासाठी विशेष पुढाकार घेत आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक. भविष्यात हे अधिक व्यापक होण्यासाठी विस्तृत जनजागृती व कृतिशील कार्यशैली व विविध उपक्रमांवर संघटनेचा भर असेल, जेणेकरून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत याचा लाभ पोहोचेल.
यावेळी अन्य नवनियुक्त सदस्य जंगम , मिस्टर शेख व सोनी व अन्य स्वयंसेवक उपस्थित होते. या सभारंभ शेवटी मिस्टर बागवान यांनी आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

