पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे १७ नोव्हेंबर २०२५ ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत “हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ( एच.पी. सी अँड एआय)” या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम चे आयोजन करण्यात आले असल्याची महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलमर्णी यांनी दिली. हा कार्यक्रम कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली (एन.एस.एम नोडल सेंटर) आणि सी-डॅक पुणे तसेच नॅशनल सुपरकम्प्युटिंग मिशन, भारत सरकार संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. एस. एस. राठोड, संचालक, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, श्री. आशिष कुवेलकर, वरिष्ठ सल्लागार, सी-डॅक पुणे, प्रा. डॉ. डी. बी. कुलकर्णी, प्रमुख, एन.एस.एम नोडल केंद्र, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली, डॉ. यू. बी. चव्हाण, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली, तसेच विभागप्रमुख डॉ. सुभाष व्ही. पिंगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. विभागप्रमुख डॉ. सुभाष व्ही. पिंगळे यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट, गरज आणि उपयुक्तता यावर प्रकाश टाकला.
या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये उच्च कार्यक्षमता संगणकाच्या विविध प्रगत तंत्रज्ञानांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम च्या प्रमुख विषयांमध्ये मल्टिकोर आणि मेनीकोर आर्किटेक्चर, शेअर्ड मेमरी पॅरलिझम (ओपन एमपी), कुडा प्रोग्रामिंग, एम. पी. आय आधारित वितरीत मेमरी पॅरलिझम, पॅरलल कम्प्युटिंग पॅटर्न्स, प्रोफाइलिंग आणि परफॉर्मन्स मेजर्स, तसेच एलएलएम आणि जनरेटिव्ह ए आय, डीप लर्निंग, एच.पी.सी फोर एन एल पी, इंडस्ट्री 4.0 यांचा समावेश होता.
कार्यक्रमात विविध नामवंत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यात डॉ. मेधा शाह, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली, डॉ. प्रमोद बिडे, एस.पी.आय.टी, मुंबई, डॉ. निलेशचंद्र पिकले, आय.आय.आय.टी नागपूर, श्री. मंदार गुरव, समांतर संगणन तज्ज्ञ, कु. अप्रुपा पवार, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली, श्री. शैलेश पाटील, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली या सर्व मान्यवरांनी उच्च कार्यक्षमता संगणन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, प्रॅक्टिकल हँड्स-ऑन सेशन्स आणि संशोधनाभिमुख संकल्पनांवर सखोल मार्गदर्शन केले. उच्चस्तरीय हँड्स-ऑन सत्रांचा लाभ मिळाल्यामुळे सहभागी प्राध्यापकांसाठी हा कार्यक्रम अत्यंत परिणामकारक ठरला.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रा. नामदेव एम. सावंत यांनी सर्व मान्यवर, सहभागी तसेच आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली. या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम मुळे शिक्षकांना हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती मिळून संशोधन व अध्यापनात निश्चितच गुणवत्तावृद्धी होईल, असा आशावाद प्रकट करण्यात आला.

