सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
अनादी काळापासून चालत आलेली, गोंधळ हि लोककला शाहीर विक्रम गोरे यांनी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, शिल्प ग्राम दर्शनला सादर केली, या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आसाम राज्याचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य हे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना राज्यपाल लक्ष्मण प्रसाद महाराष्ट्रातील लोक कलावंतांचे कौतुक करून निमंत्रणच दिले, महाराष्ट्राची लोककला गोंधळ आसामसाठी निमंत्रित करीत आहे.
महाराष्ट्राची गोंधळ लोककला सादरी करणासाठी शाहीर विक्रम गोरे नेतृत्व करीत आहेत, त्यांच्यासोबत सहकारी कलावंत अक्षय कांबळे, राजेश मागाडे, विशाल मागाडे, निरंजन भगत, किशोर भगत, रवि तेलगोटे, मेघा भगत, सहभागी झाले आहेत.
शाहीर विक्रम गोरे यांनी या अगोदर दिव- दमन, म्हैसूर, गोवा, भोपाल, पंजाब, दिल्ली, आदी ठिकाणी शाहीर सुभाष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली लोककला सादर केली आहे शाहीर विक्रम गोरे यांचे महाराष्ट्रातून लोककलावंतांचा अभिनंदनचा वर्षाव होत आहे

