पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिवसेनेचे ग्राहक तक्रार निवारण विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख,समाजसेवक नितीन काळे यांची महाराष्ट्र शासनाचे सोलापूर येथील जिल्हा चिकित्सालय रुग्णालयाच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. त्यांना नुकतेच निवडीचे अधिकृत पत्र जिल्हा चिकित्सक डॉ.वर्षा डोईफोडे यांनी दिले आहे.
यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांचे नितीन काळे यांनी आभार व्यक्त केले. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम, जिल्हा आरोग्य अधिकारी नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा डोईफोडे यांचेही आभार मानले.
आरोग्य विभागाच्या सर्व योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे यावेळी नितीन काळे यांनी सांगितले. नितीन काळे यांची निवड झाल्याबद्दल राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

