पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ श्री संत शिरोमणी नामदेव पायरी व श्री संत चोखामेळा दर्शन घेऊन करण्यात आला. डॉ. प्रणिता भालके, तीर्थक्षेत्र आघाडीचे नेते वसंत नाना देशमुख, अनिल सावंत, नागेश भोसले, मनसे नेते दिलीप धोत्रे, भगीरथ भालके उपस्थित होते. मात्र यावेळी पंढरपूर शहरातील मतदारां पेक्षा नागरिकांची उपस्थिती जास्त होती, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मुळात भालके आणि त्यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडे विकासाचे कोणतेही मुद्दे नाहीत,सौ प्रणिता भालके या स्वतः सरकोली या गावातील बंगल्यात राहतात,त्यांना पंढरपूर येथील नागरिकांच्या समस्या, प्रश्न काय समजणार, आता निवडणूक आली असल्याने त्यांनी नागरिकांची किती काळजी आहे, हे दाखवायचा प्रयत्न केला आहे, त्यांचे हे उसने अवसान असून कॉरिडॉर बाबत भयभीत झालेले मंदिर परिसरातील स्थानिक लोक त्यांच्या भूलथापाना बळी पडत आहेत.
शक्तीप्रदर्शन केले असले तरी ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची चर्चा होत आहे.
पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचारात शुभारंभ तीर्थक्षेत्र विकास आघाडी विरोधी गटातील आज सकाळी १० वाजता श्री संत नामदेव पायरी व चोखामेळाचे दर्शन घेऊन करण्यात आला. मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले; मात्र यामध्ये शहरातील मतदार कमी आणि ग्रामीणचे नागरिक जास्त होते, अशी चर्चा होत आहे स्वच्छ व भयमुक्त पंढरपूर अशी संकल्पना घेऊन विरोधकांच्या तीर्थक्षेत्र आघाडीच्या प्रचार करत आहेत.
पंढरपूर शहरातील मातब्बर नेते तीर्थक्षेत्र विकास आघाडीतील नेते भालके यांच्या प्रचारफेरीस गैरहजर होते.गेल्या अनेक दिवसात भगीरथ भालके यांचा चेहरा नागरिकांना दिसला,त्यांच्या सहित तीर्थक्षेत्र विकास आघाडीमधील मातब्बर नेत्यांनी भाजप, शहर विकास आघाडीवर तोंडसुख घेत टीका केली.

