सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर अक्कलकोट महामार्गवर असलेल्या लिंबी चिंचोळी येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. दत्तात्रय सिद्धाराम गायकवाड (वय २४, रा. लिंबी चिंचोली, दक्षिण सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. वाढदिवस होता, दिवसभर घरातील वातावरण आनंदी होते.
कुटुंबीयांनी सांगितलं होतं, घरीच वाढदिवस साजरा करायचा आहे, कुठे जाऊ नको. पण दत्तात्रय गायकवाड याने शहराकडे जाऊन येतो असे सांगून निघाला मात्र दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला आहे. वाढदिवसाच्या रात्री गावातील तरुणाचा मृत्यू झाल्याने लिंबीचिंचोळी गावात हळहळ व्यक्त होत आहे. शासकीय रुग्णालयात दत्तात्रय याचे मृतदेह पाहून कुटुंबियांनी टाहो फोडला होता.
सोलापूर अक्कलकोट महामार्गावर अपघात
दत्तात्रय गायकवाड वाढदिवसाच्या दिवशीच चिंचोळी लिंबी येथून सोलापूर शहराकडे जाताना अपघात झाला. चोवीस वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त केले जात आहे. दत्तात्रय सिद्धाराम गायकवाड लिंबीचिंचोळीहुन सोलापूरला येत असताना कुंभारी येथे अपघात घडला. गुरुवारी रात्री अपघात घडला आणि शुक्रवारी सकाळी आठ वाजता घटना उघडकीस आली.
कुटुंबीयांनी सांगितले; घरीच वाढदिवस साजरा करू
दत्तात्रय गायकवाड याचा गुरूवारी वाढदिवस होता. घरातील सर्व सदस्यांनी सांगितलं होतं. सायंकाळी घरातच वाढदिवस साजरा करू, पण दत्तात्रय हा मी शहराकडे जाऊन येतो असे सांगून दुचाकीवर गेला. पण रात्री आलाच नाही. यामुळे रात्रभर त्याचा शोध घेतला तरी तो सापडला नाही. शुक्रवारी पहाटे तो दुभाजकात जखमी अवस्थेत मिळून आला. त्याला उपचारासाठी दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. शासकीय रुग्णालयात दत्तात्रयचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.

