भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील नवीन मतदार नोंदणी करण्यास मदत वाढ देण्यात आली असून ही मुदत वाढ 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत करण्यात आली आहे. तरी नवीन पदवीधर मतदार बंधू-भगिनींनी आपली ऑनलाइन नोंदणी करावी असे आव्हान करण्यात आले आहे. या नोंदणी करता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही ही ऑनलाईन नोंदणी मोफत करण्यात येणार आहे.
ऑनलाइन नवीन पदवीधर मतदार नोंदणी केंद्राचे उद्घाटन डॉ.नवनाथ खांडेकर किर्ती कॉम्प्युटर्स संचालक राहुल ताठे-देशमुख,प्रशांत माळवदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महेंद्र देशमुख,सुयोग कृषि केंद्राचे पांडुरंग शेंडगे,वैभव लिंगे,अनिल गोरड आदि मान्यवर उपस्थित होते.
पात्रताः
पदवी प्राप्त केल्यापासून दिनांक 01/11/2025 रोजी 3 वर्षे पूर्ण होणारा पदवीधारक पुणे पदवीधर विभागातील रहिवासी (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर)
महत्त्वाची सूचना
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी दरवेळी नव्याने तयार करण्यात येते. त्यामुळे गतनिवडणुकीमध्ये मतदार नोंदणी केली असेल तरीही यावेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणीची मुदत :01 ऑक्टोबर 2025 ते 6 नोव्हेंबर 2025
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रेः
-कोणत्याही विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र किंवा पदवीच्या अंतिम -वर्षाच्या उत्तीर्ण गुणपत्रकेची झेरॉक्स प्रत
*पासपोर्ट साईज फोटो
*सही
*मतदान ओळखपत्र.
*आधार कार्ड.
*नाव बदल असल्यास गॅझेट/विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
नोंदणीसाठी संपर्क :-
डॉ.नवनाथ खांडेकर 9860436525
प्रशांत तात्या माळवदे.संपादक तेज न्युज 8329354008
राहुल ताठे- देशमुख 9975750406
दिनांक 06/11/2025 रोजी सकाळी 10 ते 5 यावेळेत ऑनलाईन नोंदणी कॅम्प आयोजित केला आहे.तरी पदवीधर मतदारांनी उपस्थित राहावे.
*नोंदणी ठिकाण:- किर्ती कॉम्प्युटर्स,राधाकृष्ण कॉम्प्लेक्स डॉ.खांडेकर हॉस्पिटल समोर,भाळवणी*


