मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ECI आणि SEC यांच्या मतदार यादी व्यवस्थापनात सुसूत्रता आणण्यासाठी एकात्मिक डिजिटल प्रणाली विकसित करण्याबाबत मागणीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती आनंद पाटील यांनी तेज न्यूजला दिली आहे.
याविषयी संदर्भ देत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ चे प्रसिद्धीपत्रक/पत्र क रानिआ/निवडणूक/का. कक्ष-८४/२०२५ अशी माहिती सांगण्यात आली आहे.
मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य (नोंदणीकृत संघटना) या संघटनेच्या वतीने, आम्ही लोकशाही प्रक्रिया अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने हा अर्ज सादर केला आहे.
उपरोक्त संदर्भात, राज्य निवडणूक आयोगाने (SEC) विधानसभा मतदार यादीतील बदलांचा विषय कार्यकक्षेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे कायदेशीर स्पष्टीकरण असले तरी, या तांत्रिक मर्यादांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान असंख्य पात्र नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहत आहेत.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, आम्ही भारत निवडणूक आयोग (ECI) आणि राज्य निवडणूक आयोग (SEC) यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक डिजिटल प्रप्णाली' (Integrated Digital System) विकसित करण्याची मागणी करत आहोत.
आमच्या प्रमुख अपेक्षा खालीलप्रमाणे आहेत.संयुक्त ऑनलाईन पोर्टलः दोन्ही आयोगांच्या डेटाबेसशी जोडलेले एक सामायिक आणि युजर-फ्रेंडली' वेब पोर्टल विकसित करावे. यामुळे नागरिकांना केवळ एकाच ठिकाणी नाव जोडणे बदलणे यासाठी अर्ज करता येईल
स्वयंचलित माहिती हस्तांतरणः मतदाराने ECI च्या पोर्टलवर अर्ज केल्यास, तो अर्ज स्वीकारला जाऊन त्याच वेळी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभाग रचनेनुसार SEC च्या डेटाबेसमध्ये त्याची तात्काळ नोंद (Pending Status) व्हावी. ECI कडून अंतिम मंजुरी मिळाल्यावर, नाव स्वयंचलितपणे दोन्ही यादी प्रणालींमध्ये अद्ययावत व्हावे. प्रभागनिहाय मॅपिंग: SEC कडून प्रभाग रचनेतील बदलांची माहिती ECI च्या प्रणालीला पुरवली जावी, जेणेकरून नवीन नोंदणी करतानाच त्याचे 'विधानसभा मतदारसंघ + स्थानिक प्रभाग असे अचूक मॅपिंग शक्य होईल.
ही एकात्मिक प्रणाली लोकशाही प्रक्रियेतील त्रुटी दूर करून मतदारांना अधिक सशक्त करेल, तसेच दोन्ही आयोगांचे काम सुलभ करेल.
आपण या मागणीचा सकारात्मक विचार करून, तातडीने अंमलबजावणीसाठी आवश्यक ती पाऊले उचलाल, ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

