इंदापूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज सोमवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकिसाठी इच्छुकांच्या मुलाखती शिवसेना राज्य संघटक बाळासाहेब भांडे यांच्या उपस्थितीत इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडल्या. यावेळी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती.
मुलाखतीस शिवसेना जिल्हाप्रमुख संजय काळे, जिल्हा समन्वयक भीमराव भोसले, तालुकाप्रमुख नितीन शिंदे, तालुका संघटक सुदर्शन रणवरे, तालुका समन्वयक अरुण पवार, युवासेना जिल्हा समन्वयक राहुल बंडगर, महिला तालुका संघटिका राणुताई इंगवले, युवासेना तालुका अधिकारी सचिन इंगळे, माजी तालुकाप्रमुख नितीन कदम यांच्यासह शिवसेना उपतालुकाप्रमुख संदीप चौधरी, विभागप्रमुख रणजित बारवकर, अभिजीत पाटील, कल्याण सवाने, उपविभागप्रमुख हेमंत भोसले, प्रदीप पवार, बंडु शेवाळे, संतोष क्षीरसागर, ब्रम्हदेव थोरात, सुदर्शन माने, अक्षय भोसले उपस्थित होते.

