महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची अवैध देशी/विदेशी मद्य व हातभट्टी दारु निर्मिती /विक्री /वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत २८ वाहनासह रूपये ९०,९७,७७५/-रुपयाचा मुद्देमाल जप्त
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची मा.श्री. राजेश देशमुख, आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मा.श्री. प्रसाद सुर्वे (अं व द) मुंबई, व मा. श्री सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त पुणे विभाग याच्या निर्देशानुसार मा. श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर मा. श्री जे. एन. पाटील प्रभारी उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर याचे मार्गदर्शनाखाली दि. ०२/१०/२०२५ ते ०८/१०/२०२५ राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची महात्मा गांधी सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर अवैध देशी/विदेशी मद्य व हातभट्टी दारु निर्मिती/विक्री/वाहतुकीवर हातभट्टी निमिती केंद्रावर व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत १४३ गुन्हे नोंद करण्यात आले असुन १२६ जणांवर कारवाई करुन ७३,४९५ ली. गुळमिश्रित रसायन, ६५१५लि. हातभट्टी दारु, १५२.३७ब.ली. विदेशी मद्य. ३१४.८२ ब. ली, देशी मद्य, ३१.२ ब.ली. बिअर, ४८७ ली. ताडी, ७५० किलो काळा गुळ, ९०.५४ ब.ली. परराज्यातील विदेशी मद्य तसेच २८ वाहनासह एकुण रूपये ९०,९७,७७५/-चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच गतवर्षीच्या सन २०२४-२५ च्या तुलनेत सन २०२५-२६ या वर्षात एकुण गुन्हयात १५ टक्के व एकुण मुद्देमालात २३२ टक्के वाढ झाली आहे. तसेच अशा प्रकारची अवैध हातभट्टी दारु निर्मिती व विक्रीवर कारवाई करण्या करीता विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे
सदर कारवाई निरीक्षक आर. एम. चवरे , ओ व्ही घाटगे, पंकज कुंभार, भवड, मोहिते, राकेश पवार, तसेच दुय्यम निरीक्षक एस डी कांबळे, श्री आर एम कोलते, धनाजी पोवार, समाधान शेळके, सुखदेव सिद, श्रीमती अंजली सरवदे,प्रितम पडवळ, राम निंबाळकर, श्रध्दा गडदे. कदम चव्हाण, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण,, संजय चव्हाण, गुरुदत्त भंडारी, आनंद जोशी, बिराजदार जवान सर्वश्री आण्णा कर्चे, नंदकुमार वेळापूरे, अण्णासाहेब फड, पवन उगले, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, कपील स्वामी, प्रशांत इगोले अनिल पांढरे, विनायक काळे, विकास वडमिले, विजय शेळके, योगीरज तोग्गी, तानाजी जाधव, प्रकाश सावंत, पुसावळे, योगेश पाटील, महिला जवान शिवानी मुढे, दिपाली सलगर, वाहनचालक मारुती जडगे, राम मदने व दिपक वाघमारे यांनी पार पाडली
तसेच अवैध मद्यविक्री. अवैध निर्मिती व वाहतूकी विरोधात कारवाई या पुढेही चालु राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३ या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. सोलापुर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

