मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर सोलापूर शहरातील अनेक मान्यवर, माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप परिवारात अधिकृत प्रवेश केला.
या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला भा.ज.पा. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश घेण्यात आला.
मोहोळ चे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने,सोलापूर उत्तर चे माजी आमदार दिलीप माने,सोलापूरचे माजी उपमहापौर पद्माकर काळे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, बिज्जू प्रधाने, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, सुभाष डांगे, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, मारुती तोडकरी, माजी नगरसेविका कल्पना क्षीरसागर, नागनाथ क्षीरसागर, सुनील भोसले, बिपीन पाटील, मदन क्षीरसागर, रवी काळे, मेघराज कल्याणकर, बाळासाहेब तांबे, सुरेश तोडकरी यांच्यासह सोलापूर शहर व परिसरातील विविध पक्ष व संघटनांचे शेकडो कार्यकर्ते यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
भा.ज.पा. परिवारात नव्याने दाखल झालेल्या सर्व मान्यवरांचे भाजपा नेतृत्वाकडून हार्दिक स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी मा. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, मा. आमदार दिलीप माने (दक्षिण सोलापूर), मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, मा. आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजीता चाकोते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यात भाजपाचा वाढता प्रभाव आणि कार्यकर्त्यांचा वाढता विश्वास हे राज्यातील विकासाभिमुख नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.