माढा प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय,,, माढा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा करण्याचे उल्लेखनीय कार्य करण्यात आले.
माढा महाविद्यालयातील एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी माढा शहरातील विविध मार्गावरील सर्वसामान्य व्यक्तींच्या कडून मानवतेच्या भावनेतून पूरग्रस्तांसाठी 52 हजार 163 रुपये निधी गोळा करण्यात आला. व या रकमेचा धनादेश पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर यांच्याकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर व एन. एस. एस .चे कार्यक्रम अधिकारी डॉ.दत्तात्रय काळेल यांनी सुपूर्त केला.
या उपक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. अशोक लोंढे एन.एस.एस. समिती मधील सदस्य डॉ.संतोष बाबरे,, प्रा. संकल्प बारबोले, , प्रा. समाधान कदम, प्रा.श्रद्धा मस्के, व प्रा.सोमवती लंगोटे कार्यालयीन प्रमुख श्री. हनुमंत खपाले यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व एन.एस.एस.चे विद्यार्थी यांनी निधी संकलन करण्यासाठी परिश्रम घेतले.