पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
नित्यं भागवतं यस्तु पुराणं पठते नरः । प्रत्यक्षरं भवेत्तस्य कपिलादानजं फलम् ॥
पंढरीतील धार्मिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या भक्ती सौरभ भजनी मंडळाचे वतीने ८ ऑक्टोंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये भागवत कथेचे आयोजित केले होते. भागवत कथा ही विठ्ठलदास भवन येथे आयोजित करण्यात आली होती.
भागवत कथा ही भागवतकथाकार ह.भ.प. विनया संकेत कुलकर्णी - उत्पात यांनी त्यांच्या सुश्राव्य अश्या शैली मधे सांगितली.भागवत कथे मध्ये ७ दिवसात श्रीराम जन्म, श्रीकृष्ण जन्म , श्रीकृष्ण विवाह , सुदामाचे पोहे , परीक्षित राजाचे पूर्व वृत्तांत तसेच भागवत कथे मध्ये दहीहंडी असे सगळे कार्यक्रम खूप सुंदर आणि मोठ्या भक्ती भावाने पार पडले .
दररोज भागवत कथेचे श्रवण करण्या साठी महिला मोठ्या भक्ती भावाने उपस्थित राहत होत्या. समारोप दिवशी यज्ञ हवन करून भागवत ग्रंथाची यथासांग पूजा करण्यात आली. व त्या नंतर
फटक्यांची आतषबाजी करीत शहरातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली . भागवत संहिता कुमार पिंपळनेरकर महाराज यांनी अगदी भक्ती भावाने वाचली . भागवत कथा आयोजित करणाऱ्यांना खूप पुण्य लागते अशी आख्यायिका आहे आणि त्या मिरवणुकीत चालल्यास खूप पुण्य मिळते अशी आख्यायिका आहे.सर्वांना महाप्रसादसुद्धा आयोजित करण्यात आला होता
सर्वांनी एकत्र येऊन भागवत कथा कार्यक्रम आणि मिरवणूक यशस्वी रित्या पार पडली.मंडळाच्या अध्यक्षा रेवती गोटेकर यांनी नियोजन करून सर्व महिलांना विश्वासात घेऊन कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला . या मंडळाच्या २६ महिला सभासद आहेत गेली २५ वर्ष त्या अविरतपणे भजनाची सेवा देत आहेत आठवड्यातून किमान एकदा भजन सेवा करीत असतात, शिवाय नवरात्रात दरवर्षी रुक्मिणी मातेसमोर एक दिवसाची सेवा करत असतात
संधी मिळाली की धार्मिक ठिकाणी आपली सेवा निस्वार्थी पणे बजावित असतात. त्यानंतर भागवत कथेची यशस्वी सांगता करण्यात आली .

