अकलूज प्रतिनिधी संजय निंबाळकर
वीर साम्राज्य ग्रुप, अकलूज हे समाजसेवा आणि एकतेचे प्रतीक ठरले आहे. मागील पंधरा वर्षांपासून दिवाळीच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हा ग्रुप रक्तदान शिबिराचे आयोजन करत असून, ही अभिमानास्पद परंपरा आजही उत्साहाने सुरू आहे.
समाजातील सेवाभाव आणि मानवी मूल्यांवरील निष्ठा या उपक्रमातून अधोरेखित होते.रक्तदान म्हणजे केवळ दान नव्हे, तर एखाद्याचे जीवन वाचवण्याचे थोर कार्य असल्याचा संदेश या सततच्या उपक्रमातून दिला जातो.याचबरोबर ग्रुपने वारकऱ्यांसाठी मोफत भोजन, पूरग्रस्तांना मदत, शैक्षणिक साहाय्य, कपडे व अन्न वितरण, आणि सामाजिक जागृती यांसारखे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.
यंदाच्या पाडव्याच्या निमित्ताने, वीर साम्राज्य ग्रुपच्या वतीने डॉ. रणजित कागदे यांचा Ph.D. (Computer Science & Engineering, Veltech University, Chennai) पूर्ण केल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.या सेवाभावी कार्यामुळे वीर साम्राज्य ग्रुप, अकलूज समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.
“अशा समाजहिताच्या वाटचालीला सदैव बळ मिळो,” अशा शुभेच्छा ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केल्या.

