पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज दीपावली पाडव्याच्या निमित्ताने अनुलोम परिवारातर्फे पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे 47 महिला आणि 28 पुरुषांना नवीन कपडे दिले आणि त्यांच्या समवेत फराळाचे ही आयोजन करण्यात आले होते.
उपस्थित असलेल्या जवळजवळ सर्वच वृद्ध मंडळींनी अनुलोम ने घेतलेल्या वैद्यकीय शिबिराची आठवण करून दिली आणि तुम्ही चांगले काम करीत आहात असे आवर्जून सांगितले ,तसेच आज तुम्ही आमच्यासाठी नवीन कपडे आणले आहेत ते आम्ही उद्या नक्की परिधान करू असेही स्मितहास्य करीत सांगितले त्यामुळे आम्हाला अत्यंत समाधान वाटले.
फराळ करीत असताना सर्वजण गप्पा मध्ये रंगून गेले होते.
या कार्यक्रमास अनुलोमचे पंढरपूर भाग जनसेवक रामेश्वर कोरे, अनुलोम मित्र जालिंदर सगर,सुरेश खोबरे,संजय खराडे,किरण सर्वगोड,शाम फुलारे ,सौ.रोहिणी सोले तसेच गोपाळपूर येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश मस्के,सुजित मस्के,प्रताप बापू सोनवणे,शेखर नागटिळक,राजशेखर पाटील इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते,या वेळी श्री संत बद्रीनाथ तनपुरे महाराज मातोश्री वृद्धाश्रम येथील व्यवस्थापक राक्षे यांनी चांगले सहकार्य केले.