जेव्हा वार्ड निहाय मतदार याद्या तपासणीसाठी येतात, तेव्हा त्या याद्यां वर आक्षेप घेण्याची संधी उपलब्ध असते. त्यावेळी नाव चुकीचं असल्यास, किंवा एखादं नाव वगळावं अशी विनंती करता येते.
पण मतदानाच्या दिवशी परिस्थिती वेगळी असते. एखादा मतदार मतदान केंद्रावर आला, तुम्ही त्याचं ओळखपत्र (मतदार ओळखपत्र / इतर मान्य कागदपत्र) तपासत आहात. इतक्यात मतदान प्रतिनिधी (Polling Agent) त्या मतदारावर आक्षेप घेतो. म्हणजे त्याला शंका आहे की हा व्यक्ती खरी मतदार नाही.
अशा वेळी नियम स्पष्ट आहेत.
मतदान प्रतिनिधीला फॉर्म 16 (भाग II) मध्ये आक्षेप नोंदवण्याची परवानगी द्यावी.त्याचे नाव, पक्ष, आक्षेपाचं कारण नोंदवून त्याची सही घ्यावी. मतदाराला शांतपणे विचारावे नाव, क्रमांक (मतदार यादीतील), आणि ओळख तपशील. जर त्याने योग्य कागदपत्र दाखवलं आणि ओळख पटली, तर पुढील टप्पा ठरवावा. जर आक्षेप कायम असेल, तर त्या मताला Challenged Vote (विवादित मत) म्हणून नोंदवावे. अशा प्रकरणात मतदान प्रतिनिधीकडून ₹2 शुल्क आकारले जाते. मतदार खरा ठरला तर ही रक्कम जप्त केली जाते.मतदार खोटा ठरला तर ती परत दिली जाते. मतदार शपथ घेऊन सांगतो की तोच खरी व्यक्ती आहे आणि मतदानाचा अधिकार त्यालाच आहे.जर शपथ दिली आणि ओळख पटली, तर त्याला मतदान करू द्यावं लागतं.
ही संपूर्ण नोंद Register of Voters (Form 17A) मध्ये करायची आणि मतदान संपल्यावर Presiding Officer’s Diary मध्ये उल्लेख करायचा.महत्त्वाचं म्हणजे
मतदान प्रतिनिधीचा आक्षेप केवळ योग्य कारणावरच स्वीकारला जातो. प्रत्येक मतदारावर उगाच आक्षेप घेणे हे गैरवर्तन ठरते.मतदाराचा सन्मान राखून चौकशी करणे ही जबाबदारी आहे, कारण मतदाराचा अधिकार अबाधित राहणं हेच लोकशाहीचं मूळ तत्त्व आहे.
शेवटी तोच प्रश्न असेल तर चुकतोय कोण...? राजकीय पक्षांचे कार्यकर्ते की नागरिकांच्या अधिकारावर संशय घेणारी व्यवस्था...?
प्रा.आनंदा आलदर 🖋️