पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथील संगणक अभियांत्रिकी विभागाने दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी “आर्डिनो इन होम ऑटोमेशन : अ प्रॅक्टिकल अप्रोच” या विषयावर तज्ज्ञ व्याख्यानाचे यशस्वी आयोजन केले.
आर्डिनो ही एक ओपन-सोर्स इलेक्ट्रॉनिक्स प्लॅटफॉर्म आहे, जी सहज वापरता येणाऱ्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरवर आधारित आहे. घरगुती स्वयंचलनासाठी आर्डिनो प्लॅटफॉर्मचा वापर करून विविध उपकरणे जसे की लाईटिंग, फॅन, सुरक्षा सेन्सर्स, आणि तापमान नियंत्रक स्मार्टफोन किंवा इंटरनेटच्या सहाय्याने नियंत्रणात आणता येतात. आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) तंत्रज्ञानामुळे हे उपकरणे एकमेकांशी जोडले जातात आणि घरातील कामकाज अधिक सुलभ, सुरक्षित व ऊर्जा बचतीचे होते.
मुख्य पाहुणे श्री. शशिकांत हिप्परगी यांनी या व्याख्यानात आर्डिनो प्लॅटफॉर्मची मूलभूत माहिती, हार्डवेअर कॉम्पोनंट्स आणि त्यांचा कसा वापर करायचा याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी स्मार्ट सेन्सर्स वापरून ऊर्जा बचत, सुरक्षा नियंत्रण, आणि घरगुती उपकरणे इंटरनेटवरून नियंत्रित करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर केली. यामुळे विद्यार्थ्यांना घरगुती स्वयंचलन तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पुनम एस. गवळी यांनी केले, तर प्रमुख पाहुणे श्री. शशिकांत हिप्परगी यांचे स्वागत विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन डॉ. एस. व्ही. पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.
द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला आणि त्यांनी आर्डिनो आधारित स्मार्ट होम प्रोजेक्ट्ससाठी नवकल्पना करण्यास प्रेरणा घेतली. विद्यार्थ्यांनी यापुढे या तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या स्टार्टअप्स, संशोधन प्रकल्प व औद्योगिक उपक्रमात योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या यशस्वी उपक्रमासाठी विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले, ज्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला.

