विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारी शाळा जळोली
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती शाखा पंढरपूर यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आदर्श शिक्षक आदर्श शाळा यांना प्रोत्साहन प्रेरणा म्हणून पुरस्कार दिले जातात.यावर्षी पंढरपूर तालुका शिक्षक समितीच्या वतीने विविध स्पर्धा, व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा,क्रिडा स्पर्धा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली शाळेला आदर्श शाळा म्हणून पुरस्कार जाहीर केला.
त्यावेळी तालुका अध्यक्ष रमेश खारे यांनी निवड पत्र देऊन अभिनंदन केले असून लवकरच प्राथमिक शिक्षक सोसायटी सभागृहात मध्ये विविध मान्यवरांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून या पुरस्काराने आणखी जोमाने काम करण्याची उर्जा निर्माण झाली.
मुख्याध्यापक अनिल जगताप, नागनाथ गायकवाड,जयवंत कापसे, कैलास नरसाळे सिध्देश्वर लोंढेदादा,शिवाजी गोरे,सोमनाथ पवार, रमेश खारे बाळू खांडेकर देवकी दुधाणे, ज्ञानेश्वर दुधाणे,आदी शिक्षक शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक परिश्रम घेत असताना जळोलीकर पदाधिकारी आणि ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य यासाठी लाभत असून सर्व मान्यवरांनी कौतुक करत अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या.

