सातारा प्रतिनिधी तेज न्युज
विजयादशमी( दसरा )हा साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त आहे दसऱ्याच्या अगोदर 9 दिवस नवरात्रात दाही दिशात देवीच्या भक्तीने भारलेल्या असतात. म्हणजे दाही दिशेवर त्याचे नियंत्रण असते .श्री प्रभू रामचंद्र यांनी रावणाचा वध केलेला असतो व विजय मिळवलेला असतो. त्या स्मरणार्थ दसरा हा सण साजरा केला जातो.
यावेळी आपली शेती अवजारे व इतर शस्त्रे यांचे पूजन शेतकरी व्यापारी करतात शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या पाठीवर सरस्वतीचा देवीचा फोटो काढून पूजन करतात व आपट्याच्या झाडाची पूजन करतात व आपट्याच्या झाडाची पाने एकमेकांना "सोने "म्हणून देऊन ही विजयादशमी व नवीन कार्याची सुरुवात करतात तसेच पेठ शिवापूर. मोरेवाडी. मोरगिरी येथील तरुण मुले मुली यांनी गेली दहा दिवस सर्व गावातून भगवा ध्वज शस्त्र घेऊन दौड यात्रा पायी काढून आणि घोषणांनी आवाज सर्व गावात दणाणून सोडला होता.
त्यांचे स्वागत व शस्त्रांचे पूजन करताना संजय हिरवे. अध्यक्ष श्री गजानन सेवा मंडळाचे अध्यक्ष .व उर्मिला उमेश हिरवे कै. के .बी. मोरे मोफत वाचनालय ग्रंथपाल .हिशोबनीस क्लार्क. कर्मचारी. यांनी आपल्या गावात शस्त्राचे पूजन व औक्षण सर्व मुलींचे मुलांचे करताना.!पेठशिवापूर येथे बरेच वर्षापूर्वी आरएसएस व हिंदू एकता या संघटनेच्या वतीने प्रार्थना व शारीरिक कसरती मलखांब व्यायाम याचे प्रात्यक्षिक कवायती शिक्षणचे उपक्रम कार्यकर्ते यांनी घेतले होते. आजही त्यावेळच्या मुलांना शारीरिक तंदुरुस्त आहेत व सार्वजनिक कामात अग्रेसर असतात. त्या सर्व दौंड यात्रेचे कार्यकर्त्यांचे व धारकरी यांचे सर्वांचे आभार व्यक्त केले!

