इंदापूर प्रतिनिधी तेज न्यूज
विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंद नगर येथील मानसशास्त्र विभागाच्या वतीने मानसिक आरोग्य या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.
विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात मानसशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून दिनांक 13/ 10/ 2025 रोजी सकाळी 10.30 मिनिटांनी एक दिवशीय कार्यशाळा व पोस्टर प्रेसेंटेशन आयोजन करण्यात आले .या कार्यशाळेसाठी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव माननीय वीरसिंह रणसिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन झाले .या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राध्यापक राजेंद्र कुमार डांगे यांनी केले आपल्या प्रस्ताविक करताना मानसिक आरोग्याची जाणीव करणे, सकारात्मक दृष्टिकोन तयार करणे, मनोधैर्य वाढविणे जीवनातील आनंद वृद्धिगत करणे ,मनातील विचार विचारांचे रूपांतर मानसिक आजारात होऊन न देणे ,विद्यार्थ्यांत आत्मसन्मान वाढविणे ,न्यूनगंड कमी करणे, स्वतःची जाणीव करून देणे ,मोबाईलचा अतिरेकी वापर आणि मानसिक आजार यांच्यातील संबंध स्पष्ट करणे असे उद्देश कार्यशाळेचे असल्याचे सांगितले.
या कार्यशाळेच्या प्रथम सत्रासाठी बारामती येथील डॉ.अपर्णा पवार यांनी मार्गदर्शन केले त्यामध्ये स्वत्वाची जाणीव करून दिली .ताण कशामुळे येतो हे सांगितले .भावनांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे हेही सांगितले . पुस्तकाशी मैत्री करा .म्युझिक थेरपी चा उपयोग करा. असे सांगितले.
तर दुसऱ्या सत्रामध्ये समुपदेशक सोनाली खाडे यांनी मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी विचारांची निर्मिती कशी होते .आपल्यामध्ये आपोआप नकारात्मक विचार कसे येतात सकारात्मक विचार पेरावे लागतात आपल्या शरीर आपले मन व विचार नियंत्रित करतात तसेच स्वतःचा शोध स्वतःचा घ्या असे सांगितले या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे हे होते.
या कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी प्राध्यापक प्राध्यापक इतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन प्रा. काजल राजे भोसले यांनी केले तसेच वक्त्यांचा परिचय प्रा. डॉ.अमित शेटे यांनी करून दिला व कार्य क्रमाचे आभार प्रा.सोमनाथ चव्हाण यांनी मानले.