पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि. 02 नोव्हेंबर, 2025 रोजी असून, दि.26 ऑक्टो. ते 05 नोव्हें. कार्तिक यात्रा सोहळयासाठी सुमारे 08 ते 10 लाख भाविक पंढरपूरला येतात. यात्रा कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हातगाडीवाले, किरकोळ व फिरते विक्रेते साहित्य विक्रीसाठी रस्त्यावर बसलेले असतात. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विक्रेत्यांचा त्रास होऊ नये यासाठी , शिवाजी चौक परीसर, श्रीकृष्ण मंदीर, चौफाळा ते श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पश्चिमद्वार, मंदीर परीसर, पुढे महाद्वार चौक परीसर या भागात साहित्य विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.
जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये दि. 31 ऑक्टो रोजी सकाळी 08.00 ते 05 नोव्हेंबर 2025 रोजीचे रात्री 08.00 पर्यंत या कालावधीत हातगाडीवाले, किरकोळ विक्रेते, फिरते विक्रेते तसेच उक्त परीसरातील दुकानदार यांना अतिक्रमण करण्यास, रस्त्यावर दुकान लावणे, साहित्य विक्री करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
सदरच्या आदेशाची अंमलबजावणी पोलीस प्रशासनाने करावी. सदर आदेशाचे उल्लंघन झालेस उल्लंघन करणारेविरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223 अन्वये कारवाईस पात्र राहिल. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.


