तांदुळवाडी प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा कदमवाडी नं. 2 येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपक्रमशील, शिक्षक दिपक परचंडे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक हनुमंत बाबर व प्रमुख पाहुणे जिल्हा नियोजन समितीचे मा.सदस्य तथा मा.ग्रामपंचायत सदस्य नागेश काकडे, तांदुळवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच शशिकांत कदम, समाजसेवक बापूसाहेब बाबर, महादेव धनवडे यांची निवड शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत जाधव यांनी करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
जय विजय शिक्षक पतसंस्था व जय विजय शिक्षक संघ यांचा चालू वर्षाचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिपक परचंडे यांना विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सयाजी राजे मोहिते पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष मिसाळ, संचालक मंडळ, माळशिरस तालुका गटशिक्षणाधिकारी महामुनी मॅडम, विस्ताराधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिळाला होता.
त्यानिमित्ताने आज शाळा व्यवस्थापन समितीकडून जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप कदम, उपाध्यक्ष सतीश बाबर, सदस्य संजय गायकवाड, महादेव धनवडे, अमोल माने, रणजित कदम, सोपान लेंगरे, पालक सुरेश मानगिरे,बाळासाहेब कदम,माता पालक संघ अध्यक्षा सोनाली कदम, सदस्य निलावती कदम, वंदना धनवडे, स्वप्नाली बाबर, अंगणवाडी सेविका धांडोरे , मदतनीस गायकवाड व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

