माढा प्रतिनिधी तेज न्यूज
पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 138 वा जयंती सोहळा नुकताच रयत शिक्षण संस्थेचे,न्यू इंग्लिश स्कूल उंडेगाव विद्यालयात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यानिमित्त विद्यालयात सर्व रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रो.डॉ.रविराज फुरडे व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ.सुशील कुमार शिंदे, डॉ. राहुल मांजरे पाटील,डॉ. नयन बरबडे व प्रा.डॉ.दत्तात्रय काळेल इ.उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवीन व्यायाम शाळेचे उद्घाटन ,रांगोळी प्रदर्शन ,सर्व रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान तुकाराम तात्या पाटील स्था. स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य हे होते.मान्यवरांनी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन केले.विद्यालयातील मुलींनी कर्मवीर स्तवन व स्वागत गीत गायले.
यावेळी मुख्याध्यापक विजयकुमार डुरे पाटील यांनी शाळेचा उंचावत गेलेला आलेख प्रास्ताविकातून व्यक्त केला.कु.आकांक्षा मस्तुद,कु.रिद्धी गुंड व कु.भक्ती पाटील यांनी सुंदर भाषणे केली.त्यांनतर बक्षीस वितरणाचे वाचन झालटे सर यांनी केले .विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी बक्षीसे देऊन कौतुक केले.त्यानंतर प्रमुख वक्ते प्रा डॉ.फुरडे रविराज सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.बोलण्यापेक्षा मुलांवर कृतीचा परिणाम अधिक होतो, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवले. त्यांनी शालेय प्रगती बाबत समाधान व्यक्त केले.सूत्रसंचालन श्रीमती.गुंजेगावकर आर.एम. व श्रीमती.मुजावर जे.सी.यांनी केले.
या कार्यक्रमासाठी श्री.डोईफोडे सर,श्री.रामलिंग बरबडे सर,श्री.सावंत सर, श्री.प्रकाशनाना गुंड, श्री. विश्वनाथ जगताप गुरुजी,श्री.दिलीप पाटील सर, श्री.प्रदीप पाटील,श्री. प्रभाकर जगताप ,श्री.मनोज पालकर ,तसेच सहशिक्षक श्री.गायकवाड एन. बी. ,श्रीमती.रणदिवे सी. आर, श्री.देशमुख बारीकराव आदी उपस्थित होते.आभार श्रीमती.कांबळे के.बी.यांनी केले.

