प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे यांचे प्रमुख उपस्थित पंढरपूर येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पाटीच्या आढावा बैठकीचे आयोजन
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे, सोलापूर जिल्हयाचे संपर्क मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे यांचे प्रमुख उपस्थित पंढरपूर येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पाटीच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पाडली.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पालिका निवडणुका संदर्भात कार्यकर्त्यांची मते जाणुन घेवून तरुणांना जास्तीत जास्त संधी कशी देता येईल यासाठी प्रयत्न करणार असून येणाऱ्या सर्व निवडणुका ह्रया ताकदीने लढवाव्यात असे आवाहन त्यांनी केले.
प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे म्हणाले की गट व गणाची माहिती देवून इच्छुकांनी गटात व गणात पक्षाची उमेदवारीची मागणी केल्याचे यावेळी सांगीतले. तालुक्यातील सर्वच निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवू असे आवाहन त्यांनी करुन कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधून निवडणुकीत जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही यावेळी काळे म्हणाले.
यावेळी युवक प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, महिला जिल्हाध्यक्षा वर्षाराणी शिंदे,प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, महिला जिल्हा उपाध्यक्षा राजश्री ताड, महिला शहर अध्यक्षा कांचन जाधव, दिगंबर सुडके, महमंद उस्ताद, नारायण शिंदे, अर्जुन जाधव, शकुर बागवान, अंकुश चव्हाण, युवक तालुका अध्यक्ष योगेश जाधव, भारत पाटील, सादीक मुलाणी, विठठलचे माजी संचालक उत्तम नाईकनवरे, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, सिताराम महाराज साखर कारखान्याचे संचालक महादेव देठे, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर व संचालक मंडळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

