फलटण प्रतिनिधी अजित जाधव तेज न्यूज
निरोगी, निकोप, निर्व्यसनी, आरोग्यसंपन्न युवा पिढी निर्माण व्हावी. मुलांना व नव्या पिढीला मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने सुजन फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र कुस्ती संमेलनाचे आयोजन दरवर्षी केली जाते. तिसरे महाराष्ट्र कुस्ती संमेलन कापशी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे उत्साही वातावरणात संपन्न झाले.
संमेलन अध्यक्षस्थान अजिनाथ राऊत नगरसेवक नगरपंचायत माढा यांनी भूषवले. संमेलन प्रसंगी कुस्तीगिरांच्या माता भगिनी यांचा आदर्श माता म्हणून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपस्थिती ज्येष्ठ नागरिकांचाही विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र कुस्ती संमेलनामध्ये कुस्तीच्या निकोप वाढीसाठी योगदान देणाऱ्या कुस्तीगिरांना वस्ताद व प्रशिक्षकांना त्यांच्या कुस्तीविषय कार्याच्या विशेष बहुमोल योगदानाबद्दल सुजन फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय खलिफा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.वस्ताद वसंतराव पाटील ठाणे, वस्ताद तानाजी घोरपडे कोरेगाव, वस्ताद पांडुरंग शिंदे इंदापूर, क्रीडा शिक्षक श्री परशुराम लोंढे सांगली, वस्ताद जाकीरभाई मणेर फलटण, वस्ताद रवींद्र काकडे आदर्की या मान्यवरांना राष्ट्रीय खलिफा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र कुस्ती संमेलन 2025 मध्ये पैलवान राम मदने आदर्की,पैलवान नंदिनी बडे बीड,पैलवान नेहा मडके सांगली,पैलवान विराज निगुडे अहिल्यानगर,पैलवान आदि गव्हाणे जामखेड या कुस्तीगिरांनी मानाच्या पाच गदा पटकाविल्या. संमेलन प्रसंगी चाळीस मनाच्या ढाल कुस्तीगिरांनी संपादित केल्या. विजेत्या कुस्तीगीरास सन्मानपत्र,स्टीलचा ग्लास, मेडल व लंगोट देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी सातारा,सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, ठाणे,अहिल्यानगर, बीड,उस्मानाबाद व धुळे जिल्ह्यातील एकशे साठ कुस्तीगिरांनी सहभाग नोंदवला एक्याऐंशी कुस्ती सामने झाले.
पैलवान मनोहर आडके, पैलवान प्रतापसिंह पवार, पैलवान सावता करणे, पैलवान रघुनाथ उगले, पैलवान आप्पासो गव्हाणे व पैलवान आयुब शेख यांनी पंच म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र कुस्ती संमेलन यशस्वी रीतीने संपन्न होण्यासाठी सागर जमदाडे, सचिन पवार, पैलवान जयदीप गायकवाड,रामहरी वहील,सुभाष माने, सुनील वाळुंज, सचिन बनकर,संतोष सूर्यवंशी,त्रिंबक बोबडे,शेखर अडसूळ, प्रशांत शिंदे, प्रशांत अब्दागिरे,माने सर, झेंडे सर, दादा जाधव, पैलवान सुधीर पुंडेकर, इनुस पठाण, जावेद आतार, सुनीती धायगुडे,शबाना पठाण, शुभांगी डोके, मोहिनी भोंगळे यांचे सहकार्य लाभले. आदर्की पंचक्रोशी व कापशी ग्रामस्थ व कुस्ती शौकीन बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुस्तीमित्र संपतराव जाधव सूत्रसंचालन ज तु गारडे व आभार अजित जाधव यांनी मानले.

