पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली (केंद्र उंबरे)येथे दिपावली निमित्ताने आकाशकंदील टाकाऊ वस्तूंपासून बनवून घेण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
त्यावेळी प्लास्टिक बाटल्या,फूगे,लोकर.कात्री,आदी वस्तू पासून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांनी स्वतः आकाशकंदील तयार केले.आणि स्वनिर्मितीचा आनंद घेतला.यामुळे सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आनंदी झाले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली पुढील काळात ही अनेक उपक्रम राबवून प्रयत्नशील असणार असल्याचे मुख्याध्यापक अनिल जगताप यांनी सांगितले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत कापसे, नागनाथ गायकवाड, सिध्देश्वर लोंढे , कैलास नरसाळे , बाळू खांडेकर सर देवकी कलढोणे -दुधाणे आणि ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले.