भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी.ता.पंढरपूर येथे आकाश कंदील तयार करणे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून व कागदापासून आकर्षक आकाशकंदील तयार केले. इ.पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी असे गट ठेवण्यात आले.
विद्यार्थ्यांने सुमारे 200 आकाश कंदील तयार केले.विद्यार्थांना मार्गदर्शन कलाशिक्षक तुकाराम खरात यांनी केले.
यावेळी या उपक्रमात शिक्षक व सेवकांनी सहभाग घेतला.विद्यार्थांचे व शिक्षकांचे कौतुक प्राचार्य के.डी.शिंदे उपमुख्याध्यापिका मोरे , पर्यवेक्षक जी.पी.बेसिकराव यांनी केले.