अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर सर्वसामान्यांना दिवाळीचा आनंद घेता या उद्देशाने उभारलेल्या रत्नाई मिठाई केंद्राचे उदघाट्न प्रदीपराव खराडे पाटील यांच्या शुभहस्ते व मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले.
उद्घाटन प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक पांडुरंग एकतपुरे, वसंत जाधव, उत्कर्ष शेटे, प्रताप क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, सचिव बिभीषण जाधव, सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.
प्रास्ताविकात उपक्रम प्रमुख विजय उबाळे म्हणाले, मंडळाने मागील सुमारे ४७ वर्षापासून जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिकतेची कास धरत पारंपरिकतेची मूल्ये जपत अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील भव्य उपक्रम आयोजित करून यशस्वी केले आहेत.
समाजातील सर्वसामान्य गरजू लोकांना योग्य दरात दिवाळी पदार्थांचा आनंद घेता यावा, या उद्देशाने दि. १५ व १६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सकाळी १० ते ८ पर्यंत शंकरनगर येथे ‘रत्नाई मिठाई विक्री केंद्र’ सुरु करण्यात आले आहे.
याप्रसंगी बोलताना उदघाटक प्रदीपराव खराडे पाटील यांनी आजच्या गतिमान काळात मंडळाच्या रत्नाई मिठाई या उपक्रमामुळे दिवाळी आल्याची जाणीव होते. सामाजिक बांधिलकीतून राबविलेल्या या उपक्रमाचे उपक्रमाचे कौतुक केले.
मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी बोलताना सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रेरनेने बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने आजपर्यंत अनेक उपक्रम राबवून यशस्वी केले आहेत. याचे सर्व श्रेय हे पडद्यामागे कार्य करणाऱ्या सर्व घटकांचे असल्याचे सांगितले. सर्वांनी येथील पदार्थांचा लाभ घ्यावा.
या उपक्रमास ग्राहकांचा देखील उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून सुमारे ५५०० किलोपेक्षा जास्त विक्रीपूर्व नोंदणी झाली आहे. यंदाही ७५०० कि. पेक्षा अधिक विक्री होईल. या केंद्रात चिवडा, लाडू, बालुशाही, शंकरपाळी व चकली हे स्वच्छ व उच्च दर्जाच्या साहित्यापासून बनवलेले पदार्थ केवळ २६५ रु किलो या रास्त दरात उपलब्ध होणार असून ग्राहकांच्या सोयीसाठी ३ ते ५ किलो पदार्थ घेणाऱ्या ग्राहकांना भव्य सूटही देण्यात येणार आहे. यामध्ये ३ किलो ७५५/- रु., ४ कि. १००७/- रु., ५ कि. ११९२/- रु. मध्ये मिळणार असल्याचे सांगून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपाध्यक्ष भोसले पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास यशवंतनगर परिसरातील अनेक नागरिक, व्यापारी, मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी केले.