पाटण प्रतिनिधी तेज न्यूज
पाटण तालुका ग्रंथालय संघ पाटण व ग्रामीण सर्व ग्रंथालय सदस्य यांच्यावतीने काही मागण्यांचे निवेदन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना
निवेदन देण्यात आले.
यावेळी राज्यातील ग्रंथालय व ग्रामीण ग्रंथालयाच्या मागण्या व ग्रंथालय मोफत वाचनालय चळवळ टिकून राहण्यासाठी काही मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल बाबा भोसले ,युवा नेते सत्यजितसिंह दादा पाटणकर , याज्ञशन दादा , संजय इंगवले घाडगे .निकम. संजय हिरवे .सुतार साहेब .इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा पाटण तालुका ग्रंथालय संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील ग्रंथालय संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

