पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्यामध्ये अलीकडेच आलेल्या आपत्कालीन पूरस्थितीमुळे अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शासनाकडून मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे.
सदर परिस्थिती लक्षात घेता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचारी संघ (संलग्न - भारतीय मजदूर सेना) यांच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस (Chief Minister Relief Fund) देण्याचा निर्णय एकमताने सर्व कर्मचारी यांच्या वतीने घेण्यात आला आहे.अशी माहिती कर्मचारी संघाचे अध्यक्ष सुधाकर घोडके यांनी दिली आहे.
त्याबाबत आवश्यक कार्यवाही करून एक दिवसाच्या पगाराची रक्कम वजा करून शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाठविण्यात यावी.अशी विनंती कर्मचारी संघाचे सचिव सावता हजारे यांनी केली आहे

