वृत्तपत्र विक्रेत्यांना कल्याणकारी मंडळाच्या सर्व सोयी सुविधा द्याव्यात
थंडी उन्हाळा पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये कोणतीच तमा न बाळगता आपले काम इमाने इतबारे व वेळेत पूर्ण करणारा घटक म्हणजे वृत्तपत्र विक्रेता हा होय परंतु सर्वांकडून उपेक्षित राहिलेला आहे परंतु काळानुरूप विक्रेत्या वर्गाचाही विचार करणे अत्यंत गरजेचे आहे शासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांना असंघटित कामगारांच्या सर्व सुविधा लागू करण्यात याव्यात 15 ऑक्टोबर हा महामहीम राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल जी कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे 15 ऑक्टोबर 2018 रोजी खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये नांदेड येथे च पत्र विक्रेता दिनाची सुरुवात करण्यात आली व हा दिवस सर्वत्र वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला जातो विशेषतः विक्रेत्या वर्गात हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो समाजानेही याची कुठेतरी दखल घेणे गरजेचे आहे कारण हा घटक यात काम करणारे विक्रेते बांधव ऊन वारा पाऊस थंडी याची तमान बाळगता आलेली वर्तमानपत्र तीन-साडेतीन किलोमीटर अंतरापर्यंत सायकलवर तेही वेळेत पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे अव्यहातपणे करत आलेले आहेत परंतु त्यामानाने विक्रेत्याला इतर कोणत्याच सुविधा मिळत नाही ही खंत आहे आजही वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी
वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी झगडावे लागते हे वृत्तपत्र विक्रेत्यांचे दुर्दैव आहे असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही जेव्हा शंभर रुपयाचे अंक विक्री द्यावी तेव्हा कुठे त्याला तीस रुपये म्हणजेच शेकडा 30 टक्के कमिशन मिळते हेही मिळवण्यासाठी त्याला बारा वर्षे लढा द्यावा लागला हे सत्य नाकारता येणार नाही एवढा हा वृत्तपत्र विक्रेता घटक दुर्लक्ष केला आहे शासनाने इतर मंडळांना ज्या सुविधा दिली आहेत त्याच धर्तीवर महामहीम राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या वाचक दिनाच्या निमित्ताने व वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापना करून त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन उपेक्षित अशा विक्रेत्याच्या जीवनात सवलतीचा आधार द्यावा त्यामुळे त्याला दिलासा मिळेल याकरता शासनाने संबंधित नेते मंडळींनी जाणकार आणि यात लक्ष घ**** गरजेचे आहे व वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापनाची घोषणा जरी केली असली तरी त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप झालेली नाही 15 ऑक्टोबर वृत्तपत्र विक्रेता या दिनाचे औचित्य साधून प्रत्येक प्रेसमालकांनी विक्रेत्यासाठी कल्याणकारी मंडळाच्या सुविधा लागू करण्यासाठी योगदान द्यावे असे म्हणल्यास गैरवा वावगे ठरणार नाही कारण वृत्तपत्र विक्रेत्याकडे काही जण आजही उपेक्षित घटक म्हणूनच पाहतात तर काहीजण विक्रेत्याच्या कष्टाचे मोल जाणून त्याचा आदरही करतात हाही तेवढाच जमिनीचा भाग आहे त्यामुळे विक्रेत्याला काम करताना अधिक बळ मिळते ते वाचकांच्या ग्राहकांच्या पाठबळामुळेच हे खरेच आहे
या व्यवसायाकडे पूर्वी चे विक्रेते एजंट हे एक व्रत म्हणून पहात होते परंतु काळा बदलला आहे या व्यवसायात विशेषता विक्रेत्याच्या कष्ट अधिक व मोबदला कमी यामुळे आता नवीन पिढी या व्यवसायाकडे वळण्यासाठी तयारच नाही हेही प्रकर्षाने जाणवत आहे केवळ पूर्वापार एजन्सी वा व्यवसाय आहे म्हणून बोटावर मोजण्याइतकेच वारसदार या व्यवसायाकडे वळलेले आहेत या व्यवसायात सवलती पेन्शन यासारख्या गोष्टी नसल्याने नवी पिढी तर पाहण्याचे तयार नाही परंतु जोपर्यंत प्रिंट मिळेल जिवंत आहे तोपर्यंत वाचक आणि विक्रेता यांचेही नाते टिकले जाणार आहे तो टिकवण्याचा प्रयत्न या व्यवसायातील जाणकार विक्रेते करताना दिसून येतात परंतु विक्रेत्यांच्या कष्टा बाबत कोणालाच पाझर फुटत नाही हे वरील गोष्टीवरून दिसून येते गेली बारा वर्षे झाली वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करावे यासाठी राज्यातील तमाम विक्रेते बांधव तळमळीने लढा देतात परंतु त्यांच्या लढ्याला म्हणावे तेवढे पाठबळ मिळत नाही म्हणूनच वृत्तपत्र विक्रेता वर्ग आजही उपेक्षित राहिलेला आहे मध्यंतरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची स्थापनेची घोषणा केली यानंतर काही मंडळांच्या घोषणाही करण्यात आले त्या मंडळाच्या पदरात योग्य ते दानही शासनाने राज्यकर्त्याने टाकले परंतु वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाच्या पदरात अद्यापही सवलतीचे कोणतेही दान पडले नाही हे आजही विक्रेत्याचे दुर्दैव म्हणावे लागेल
वृत्तपत्र विक्रेता हा ग्राहकापर्यंत वाचकापर्यंत वर्तमानपत्र पोहोचवण्याचे काम हिमाने इतवारी करत असतो हे करत असताना एखाद्या विक्रेत्याच्या घरात दुर्दैवी घटना घडली तरीही त्याला ते बाजूला दुःख ठेवून वृत्तपत्र वाचकांच्या घरी पोहोचवण्याचे काम करावे लागते ते तोही करतो परंतु याची जाणीव फारच थोड्या लोकांना वाचकांना असते 15 ऑक्टोबर महामहीम राष्ट्रपती अब्दुल जे कलाम यांचा जन्मदिवस वाचक दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून राज्यभर साजरा केला जातो हे करत असताना आजपर्यंत कुठल्याही एका नेत्याने ठोसपणे पाठपुरावा करून विक्रेत्याच्या पदरात कल्याणकारी मंडळ रुपी सवलतीचे दान टाकले नाही जे टाकले ते फक्त आश्वासनाचे दान टाकले असे म्हणल्यास गैर ठरणार नाही दुसऱ्या मंडळांना सवलती दिल्या याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचे नाही परंतु आमच्या हक्कासाठी गेली बारा वर्षे झाली आम्ही लढा देत आहे आमच्या कल्याणकारी मंडळाच्या सवलती आम्हाला या दिनाच्या निमित्ताने शासनाने देऊन तमाम विक्रेत्यांचा सन्मान करावा एवढीच यावाचक दिनी व वृत्तपत्र विक्रेता दिनी इच्छा आहे
कंपनी कामगाराप्रमाणेही विक्रेत्यांना सोयी सवलती देण्याची गरज आहे शासनाने तातडीने लक्ष घालून कल्याणकारी मंडळाची स्थापना करून सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना सन्मानाने वागणूक देण्यात यावी विम्याची सोय करण्यात यावी व पेन्शनची सोय करण्यात यावी एवढीच 15 ऑक्टोबर वाचक दिनी व वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने सर्वांच्या वतीने इच्छा व्यक्त करतो. वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांना वृत्तपत्र विक्रेत्या दिनाच्या व वाचक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा.
नंदकुमार देशपांडे
सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना उपाध्यक्ष