पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील नवीन कराड नका येथील युनिव्हर्सल निवासी गुरुकुलचे संचालक प्रा.वैभव घाडगे यांना राज्यस्तरीय डॉ. कलाम राष्ट्र उभारणी पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले.
सोलापूर येथील व्ही व्ही पी कॉलेज येथे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम याच्या 94 व्या जयंतीनिमित्त ड्रीम फाउंडेशन, डॉ. कलाम मिशन, कोचिंग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्र राज्य व अन अकॅडमी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सीसीए चे राज्य अध्यक्ष प्रा. डॉ. पी एम वाघ यांच्या हस्ते प्रा. वैभव घाडगे यांना शाल,प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी , आत्मीय एज्युकेशन पुणे रिजनल हेड डॉ. नीरजकुमार शहा, सीसीए राज्य सरचिटणीस ज्ञानेश्वर ढाकणे, व्हीव्हीपी कॉलेज सोलापूरचे अध्यक्ष प्रा.डॉ. जी के देशमुख,प्राचार्य कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते . हा पुरस्कार मिळाल्यानंतर प्रा. वैभव घाडगे यांनी ऋण व्यक्त करताना ''कानडा राजा पंढरीचा'' हे भक्ती गीत गायले.
प्रा.घाडगे यांचे ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने शिक्षण सेवा देण्याचं कार्य ८ वर्षापासून अविरत सुरू आहे. १ली ते१२वी(JEE/NEET/NDA/MH-CET) गरीब, अनाथ,हुशार होतकरू विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतीगृह विद्यार्थ्यांची जेवणाची, राहण्याची अभ्यासाची व कम्प्युटर क्लासेसची उत्तम व्यवस्था त्यांनी केली आहे. त्यांच्या युनिव्हर्सल अकॅडमी मधून आतापर्यंत हजारो विद्यार्थी यशस्वी होऊन चांगल्या पदावरती कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांच्या अकॅडमी मधून दोन विद्यार्थिनींनी महाराष्ट्र मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन उपस्थित मान्यवरांनी केले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रामदास नागटिळक, राहुल ताटे सर, पत्रकार प्रशांत माळवदे, प्रा.झुंजार देशमुख , प्रा. सि.टी पवार सर, प्रा. सरवदे , प्रा.नागेश घाडगे , प्रा. विजय जाधव सर, प्रा.प्रियंका शिंदे मॅडम, प्रा. गायत्री मॅडम, प्रा. सोनाली मॅडम,सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अभिनंदन केले.