भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची सन 2024-25 या आर्थिक वर्षाची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन कल्याणराव काळे यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न् झाली.
वार्षिक सभेतील विषय पत्रिकेतील सर्व विषयांस उपस्थित सभासदांकडून हात उंचावुन एकमताने मंजूरी देण्यात आली. यावेळी सभासदांचे सुचनेनुसार एैनवेळी आलेल्या विषयावरही सर्व सभासदांनी आवाजी एकमताने मंजुरी दिली. विषयाचे वाचन प्र.कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे यांनी केले.
यावेळी सभासद शंकर चव्हाण महाराज, मच्छिंद्र पोरे- वाखरी, वसंत फाटे-गार्डी, ज्ञानेश्वर झांबरे-देवडे, दाऊदभाई शेख-भाळवणी, बाळासाहेब वाघमारे-बाभुळगांव, नवनाथ शिंदे-पिराची कुरोली यांचे हस्ते श्रीविठ्ठल व संस्थापक सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कारखान्याचे संचालक युवराज दगडे यांनी श्रध्दांजली ठराव मांडला. व अहवाल सालात व आजअखेर विविध क्षेत्रात दिवंगत झलेल्या व्यक्ती तसेच ऊस उत्पादक सभासद बिगर सभासद, कामगार इत्यादींना श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी सभेचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थापक सहकार शिरोमणी वसंतदादा काळे व त्यांचे सहकारी यांच्या अथक परिश्रमातुन या संस्थेची उभारणी केली असून, त्यांच्या अचार विचारांचा वारसा जपत आम्ही सर्व संचालक कामकाज करीत आहोत. परंतु हा कारखाना चालु नये, बंद पाडण्यासाठी विरोधकांनी अपप्रचार, बदनामी, असे अनेक अडथळे आणले, शासकीय कार्यालयात तक्रारी दाखल करण्यात आल्या, त्यामुळे कारखान्यास वेळेत निधी उपलब्ध झाला नाही, मात्र त्यांच्या अपप्रचाराला बळी न पडता सर्व सभासदांचे, कामगारांचे व या संस्थेवर उपजिविक करणाऱ्या कुटुंबियांचे हित डोळ्यासमोर ठेवुन आर्थिक अडचणीन मार्ग काढत ही संस्था मार्गक्रम करीत असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित सभासदांनी उपस्थित केलेल्या 12 मुद्याचे पुराव्यासह निरसन चेअरमन काळे यांनी करुन उपलब्ध निधीचा ऊस बिल, तोडणी वाहतुक बिल, कामगार पगार इ. साठी केल्याचे सांगतले. तसेच सन 2025-26 गळीत हंगामामध्ये सुमारे 6.00 लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट् असून, नोव्हेंबरचे दुसऱ्या आठवड्यात कारखाना सुरु करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज् ठेवण्यात आली असून, ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला संपुर्ण ऊस सहकार शिरोमणी कारखान्यास गळीतास देण्याचे आवाहन केले.
एैनवेळी कारखान्याचे सभासद रणजीत जाधव सह इतर सभासदांनी संस्थेच्या हितास बाधा आणणाऱ्या, संस्थेस आर्थिक नुकसान पोहचविणाऱ्या सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी केली. त्यास उपस्थित सर्व सभासदांनी आवाजी एकमताने मंजुरी दिली.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर, संचालक सर्व मोहन नागटिळक, गोरख जाधव, राजाराम पाटील, दिनकर कदम, तानाजी सरदार, योगेश ताड, युवराज दगडे, परमेश्वर लामकाने, जयसिंह देशमुख, संतोषकुमार भोसले, सुनिल सराटे, अमोल माने, अरुण नलवडे, राजाराम जगदाळे, विश्वास उपासे, भारत आंबुले, विक्रमसिंह बागल, जोतीराम पोरे, दिनकर डोंगरे, बाळु माने, मालन काळे, सौ. उषाताई माने, सौ.संगिता देठे, माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले मा.संचालक काका म्हेत्रे, भारत गाजरे, पांडुरंग कौलगे, प्रदिप निर्मळ, अरुण बागल अधिकारी कर्मचारी व ऊस उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


