सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लाडके देवा (भाऊ) आमच्याकडे लक्ष द्या विमानात बसुन आलात आमच्या कडे जरा बघा ते किट सोबत आर्थिक मदत येऊ द्या जे आमच्या हक्काचं आहे .
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार दि 25 ऑक्टोबर रोजी आयोजित आक्रोश मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत.
अतिवृष्टी व प्रचंड महापुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्त शेतकरी,महिला व युवकांच्या विविध हक्काच्या मागण्यांसाठी ड्रीम फौंडेशन युवा मंच ,बसव संगम शेतकरी गट तर्फे आक्रोश मेळावा शनिवार दि 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता हत्तरसंग कुडल येथून सुरुवात लाडके देवा (भाऊ)आमच्या कडे लक्ष द्या विमानतळ उद्घाटन साथी लाखो खर्च केले आमचे लाखो नुकसान झाले हजारोत काय मदत करताय तुमच्या एक दिवसाचा दौरा खर्च लाखोंचा असतो आमचं उभं पीक गेलं,शेतातील माती गेली गेली,घर उद्वस्थ झाले अजून वाट कसली पाहताय मदतीसाठी का तेही इव्हेंट करणारे कार्यक्रम करून वाटणार आहेत का, आज धनत्रयोदशी आहे धन आरोग्य याची पूजा करताना देवा सोबत देवा भाऊ तुमची पूजा करू पण आम्हाला लाखोंच्या आकड्यात मदत हवेत ,जे आमच्या हक्काचं आहे,पीक विमावाले,CSR वाले, उद्योजक सर्वांचे आलेले मदत इकडे आमच्याकडे पोहोच करा बस झाले अक्षय पात्र चे भात खाणे आमचे जिणे जगण्याची आत्ता पैसे लागणार आहेत ते देऊन देवकृपा होऊ द्या बाकी काय इव्हेंट करायचं ते करा,आमची दिवाळी काळीच होणार पण त्यानंतर उभे राहण्याची सन्मानाने जगण्यासाठी मदत करा भीक नको हक्काचं द्या.
तेही आमच्याच लोकांनी दिलेलं व आमच्या tex मधील पैसे तरी द्या विनंती हा संदेश तुम्हाला मिळेल की नाही माहीत पण आम्हाला मदत लवकर करा मी ही एक पूरग्रस्त शेतकरी काशिनाथ गाव हत्तरसंग तालुका दक्षिण सोलापूर आमच्या एकत्र कुटुंबात असलेलं 5 एकर उभं पीक पाण्यात गेले, सर्व काही संपले,400 फूट पाईप,300 फूट केबल वायर,5 HP मोटार,3 HP बोर,पाईप वायर सगळे वाहून गेले एवढंच नाही तर अर्धा एकर शेतातील माती सुद्धा वाहून गेले,माझ्यासारखे हजारो लोकांचे खूप मोठे नुकसान झालेल्या लोकांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी दुसऱ्यांनी दिलेले धान्य वाटणारे तुमचे नेते इकडे पाठवू नका आत्ता कॅश नाहीतर direct मदत आमच्या शेतकऱ्यांना खात्यावर लवकर मिळावे,आम्ही शनिवार 25 ऑक्टोबर रोजी आमच्या संपूर्ण कुटुंब आणि पूरग्रस्त शेतकरी, महिला ,युवक विद्यार्थी आक्रोश मेळावा घेणार आहोत लवकर दखल घ्यावी ही विनंती खात्री आहे आपण लाडके देवा भाऊ आहेत सर्वांचे विचार करता म्हणून हक्काने बोलताय,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा हे जून झालं आत्ता मोडून पडलं घर,वाहून गेले संसार उद्वस्थ झालं शेत आत्ता मदत देतो म्हणा.
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रमुख मागणी
1)अतिवृष्टी व महापूर मुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित संपूर्ण कर्जमाफी व्हावी सातबारा कोरा करावेत
2)सीना व भीमा नदीच्या प्रचंड महापूर मध्ये वाहून गेलेले पाईपलाईन, मोटार,केबल वायर नवीन घेण्यासाठी सबसिडी मिळावी व नवीन पाईपलाईन साठी तात्काळ मदत हवे
3)पुढील दीड वर्ष शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण फीस मोफत करावेत अगदी इनिजरीयरिंग,मेडिकल,शाळा,कोचिंग हॉस्टेल फीस सरकारने भरावेत याची यादी करून बघावं
4)सीना नदीला महापुर अचानक कसे आले एवढे पाणी एकदम जमा होईपर्यंत अधिकारी काय केले याला जबाबदार अधिकारी वर चौकशी करून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावेत.
5)शेतकऱ्यांना तात्काळ मदत निधी म्हणून प्रत्येकी कुटुंबास 1 लाख रुपये मदत मिळावे.
6)शेतकऱ्यांना शेतात नवीन पीक घेण्यासाठी ,शेत नांगरणी कोळपणी करण्यासाठी ट्रॅक्टर व आधुनिक यंत्र सामुग्री खर्च म्हणून शेतकऱ्यांना मदत व बी बियाणे मिळावे.
7)पूरग्रस्त भागातील महिलांना पुढील 6 महिने रोजगार उपलब्ध करून घ्यावेत व दरमहा 9000रुपये निधी मिळावेत.
8)पूरग्रस्तांना मानसिक आधार व प्रेरणा देण्यासाठी समुपदेशन कार्यक्रम शासनाने राबवावेत
9)महापूर मुळे शेतातील माती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना इतर ठिकाणाहून माती शेतात आणून घालण्यासाठी जेसीबी,इंधन उपलब्ध करून घ्यावेत.
10)पूरग्रस्त भागात तात्काळ रोजगार हमी योजना सुरू करावेत.
11)युवकांना नोकरीसाठी पूरग्रस्त युवकांना प्राधान्य मिळावेत
12)पूरग्रस्त भागात आरोग्य शिबीर घ्यावेत रोगराई होऊ नये म्हणून स्वच्छता अभियान उपक्रम राबवावेत
13)महापुरात ज्यांचे घर उध्वस्त झाले त्यांना नवीन घर बांधण्यासाठी 30 लाख रुपये व घरात पाणी येऊन नुकसान झालेल्या लोकांना 10 लाख रुपये तात्काळ मिळावेत.
आक्रोश मेळावा संयोजक पूरग्रस्त शेतकरीपुत्र काशीनाथ भतगुणकी मो 7219099955 रा हत्तरसंग तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांनी आव्हान केले आहे.