मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वतःची टेस्ला गाडी मिरवत आहेत पण सामान्य जनतेला आणि एसटी वाहकांना अतिशय वाईट अवस्थेत असलेल्या एसटी गाड्यांमध्ये जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे आणि अशाच गाड्या चालवाव्या लागत आहेत.
हजारो एसटी गाड्या रस्त्यावर आहेत ज्यांचे दरवाजे, सीट, खिडक्या मोडलेल्या आहेत, छप्पर गळत आहेत… पण फडणवीस सरकारच्या परिवहन मंत्र्यांना त्याची काहीच फिकीर नाही. त्यांना तर फक्त चमकदार गाड्या, फोटोशूट आणि 'फोटोपॉलिटिक्स' महत्त्वाचे आहे.
परिवहन विभाग अतिशय अकार्यक्षम झाला आहे, कर्मचारी त्रस्त आहेत, प्रवासी हैराण आहेत आणि मंत्रीमहोदय ‘टेस्ला टूर’ वर आहेत! सामान्य जनतेचा विचार करायला वेळ आहे का फडणवीस सरकारला?