पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शुक्रवार दि .३ ऑक्टोबर रोजी अवली, ता. आटपाडी, जि. सांगली येथील राजाराम गोविंद जाधव यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास चांदीची घागर नग २ भेट स्वरूपात दिल्या.
या घागरांचे एकूण वजन १९०० ग्रॅम (१ किलो ९०० ग्रॅम) असून त्याची किंमत रु. २,४६,०००/- इतकी आहे.
या प्रसंगी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते भाविक राजाराम गोविंद जाधव यांचा सत्कार करण्यात आला.मंदिर समितीच्या वतीने या उदार दानाबद्दल जाधव कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.

