सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीच्या वतीने 'श्री ' ऑक्टोबर सेवा सप्ताह दिनांक २ ऑक्टोबर २५. ते ८ ऑक्टोबर २५. पर्यंत सेवा कार्याचे आयजोन करण्यात आली आहे.
२ ऑक्टोबर २५ रोजी रेल्वे स्टेशन जवळील महात्मा गांधी पुतळ्यास पुष्प अर्पण आणि प्रार्थना घेऊन सप्ताहाचे उद्घाटन प्रांत ३२३४ डी -१. रिजन १. चे रिजन चेअरमन एडव्हकेट लायन श्रीनिवास कटकुर शुभ हस्ते करण्यात आले.
तसेच माजी प्रांतपाल एम जे एफ लायन अरविंद कोणशिरसगी यांच्या वाढदिवसानिमित्त एक झाड आपल्या आईसाठी ९ झाडे वॄक्षारोपण करण्यात आले.
डॉ कोटणीस रेल्वे हॉस्पिटल येथे डिस्ट्रिक्ट चे झोन चेअरमन लायन सोमशेखर यांची प्रमुख उपस्थिती होती. नेत्र तपासणी शिबीरात ४५ जण, रक्त तपासणी शिबीर ३५ जण , मधुमेह तपासणी शिबीरात ४८ जण यावेळी क्लबचे अध्यक्षा डॉ कॄष्णा राहुल चंडक, एम जे एफ लायन डॉ राहुल नारायणदास चंडक, झोन चेअरमन लायन सोमशेखर भोगडे, खजिनदार लायन प्रभाकर जवळकर, सेवा सप्ताह प्रमुख कॅबिनेट ऑफिसर लायन मुकुंद जाधव, रविकिरण वायचळ यांची उपस्थिती होती.

