पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
पंढरपूर शहरातील वाहतुकीचा प्रश्न वरचेवर बिकट होत चालला आहे कारण विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या बाहेर गावातील वाहनधारकांना पार्किंग ऐवजी जिथे मोकळी जागा दिसेल तिथे बिनधास्तपणे रस्त्याच्या कडेला चार चाकी वाहने उभा करून दर्शनास जातात यामुळे रहदारीचा रस्त्यावर अडथळाच होतो. परंतु वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात अलीकडे होताना दिसून येत आहे शहरांमध्ये येणाऱ्या गाड्या थेट गोपाळ कृष्ण मंदिराजवळ आल्याने व गाडी रस्त्याच्या मध्यभागी उभा करून गाडीतील प्रवासी उतरवले जातात. त्यामुळे विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या व येणाऱ्या लोकांना वाहनाच्या गर्दीतून वाट करावी लागते हे आता पंढरीत नित्याचेच झाले आहे.
पंढरपुरातील वाहतूक सुरळीत व्हावी याकरता वाहतूक शाखेकडे कार्यरत असलेले 15 ते 20 पोलीस कर्मचारी हे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी आलेल्या वाहनधारकाकडे दंडात्मक कारवाई करण्याकडेच जास्तीचा कल असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे चार चाकी वाहनधारक बिनधास्तपणे शहराच्या मध्यवर्ती विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या गोपाळ कृष्ण मंदिर जवळील गणपती मंदिरासमोर चार चाकी वाहने बिंदास उभी करून आतील लोक उतरवले जातात त्यामुळे नागरिकांना या वाहनाचा त्रास मोठ्या प्रमाणात त्रास जाणवू लागला आहे हीच परिस्थिती स्टेशन रोड बस स्थानक मार्ग या ठिकाणी व शहराच्या मोक्याच्या ठिकाणी दिसून येते वास्तविक पाहता दर्शनासाठी येणारे चार चाकी वाहनधारक यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकातूनच पार्किंग कडे जाण्यास भाग पाडण्या ऐवजी थेट गाडी गोपाळ कृष्ण मंदिरापाशी आणली जाते व त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस खडबडून जागे होऊन या वाहन धारकाला गाडी आत आणली म्हणून दंडात्मक कारवाईचा बडगा दाखवला जातो.
वास्तविक पाहता या वाहनधारकांना छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळच आत जाण्यास प्रतिबंध का केला जात नाही हे एक न उलगडणारे कोडे आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच गजानन महाराज मठाच्या पाठीमागे लाखो रुपये खर्च करून वाहनतळ अर्थात पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे परंतु वाहनधारकांना ते माहित नसल्याने वाहनधारक थेट जिथे जागा मोकळी दिसेल तिथे वाहने उभे करून दर्शनाला जातात कोणाच्याही दुकानापुढे वाहने उभे केले जातात त्यामुळे दुकानदार व वाहनचालक यांच्यात काही वेळा वादावादीचे प्रसंग निर्माण झाले आहेत.
वाहतूक शाखेच्या पोलिसांचे प्रथम काम हे वाहतूक नियंत्रणाचे असताना याकडे मात्र जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक गोपाळ कृष्ण मंदिर परिसर सरगम चौक या ठिकाणी वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच भाव झाली आहे अशातच गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जड वाहनेही रात्रीच्या वेळी व काही दिवसा शहराच्या भरवस्तीतून मार्गस्थ होताना दिसून येतात वास्तविक पाहता ही जड वाहने रात्री बारा ते पहाटे चार पर्यंत मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरातील दुकानदारांना मदत पोहोचवण्यासाठी परवानगी असताना तसे न होता सर्रास मोठी वाहने जड वाहने शहराच्या सरगम चौक स्वातंत्र्यवीर सावरकर चौक या मार्गे मार्गस्थ होताना अनेकांनी पाहिले आहे.
शहरातून होणारी जड वाहतूक वाहतूक शाखेने कायमस्वरूपी बंद केली जाईल व शहरात होणाऱ्या व गजबजलेल्या ठिकाणी वाहनाची होणारी कोंडी ही दूर करावी अशी नागरिकातून मागणी होत आहे.

