पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी हनुमंतराव मोरे यांची तर गादेगाव विविध कार्यकारी सोसायटी नंबर-२ च्या चेअरमनपदी अविनाश रामचंद्र बागल यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते पंढरपूर येथील कार्यालयात सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी बोलताना नागेश फाटे यांनी मिळालेल्या संधीचा वापर सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी करावा अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी काँग्रेस कमिटीचे नूतन जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत मोरे व गादेगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अविनाश बागल यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नवनाथ बचुटे, संजय बागल, डॉ. रमेश फाटे, संग्राम कापसे, विनय शिंदे, शुभम फाटे उपस्थित होते.