सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीचे लायन नागेश बुगडे, लायन सौ ममता बुगडे यांच्या वतीने दिवाळी निमित्त निर्मिती संकुरा विजापूर रोड सोलापूर येथे कष्टकरी ३० महिलांना साडी आणि फराळ वाटप लायन्स इंन्टरनॅशनल प्रांत ३२३४, डी -१, रिजन -१, झोन -५ चे झोन चेअरमन लायन सोमशेखर ईरप्पा भोगडे यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लबचे जेष्ठ सदस्या एम.जे.एफ. लायन सौ ममता बुगडे, झोन सचिव लायन नागेश बुगडे तसेच निर्मिती संकुरा सन्माननीय सदस्य शाम कांबळे, संतोष मुरुमकर, मिलिंद दाते, अभिजित देशपांडे या मान्यवरांची उपस्थिती होती. स्वागत आणि कार्यक्रमांची रुपरेषा लायन ममता बुगडे यांनी केले.
यावेळी झोन चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. झोन चेअरमन यांनी लायन नागेश बुगडे आणि एम.जे.एफ लायन ममता नागेश बुगडे यांचे कार्य कौतुकास्पद तर कष्टकरी महिलांना दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा या कुटूंबानी सेवाकार्य केले. शेवटी आभार प्रदर्शन झोन सचिव लायन नागेश बुगडे यांनी केले.