पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
आपण जाणताच आहात मागील महिन्यात सोलापूर पुर्व भागात आणि बीड जिल्ह्यातील अनेक भागात प्रचंड पाऊस आणि धरणामधुन पाणी सोडल्याने वरील भागाला पुराचा तडाखा बसला त्यामुळे अपरिमीत नुकसान झाले ती नुकसान कधीच भरून येणार नाही याची जाणिव सर्वांनाच आहे.
असा संकट समयी आपण अल्प मदतीचा भाग म्हणुन समाज पुरग्रस्त बांधवांसाठी काही मदतीचा हात देण्यासाठी खालील प्रकारचे सहकार्य पुरग्रस्त बाधीत समाज बांधवांसाठी मदतीचा करण्यासाठी नामदेव समाजोन्नती परिषद यांच्यावतीने यावर्षीच्या इयत्ता १० व १२ वी या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीची परिक्षा फी ५२०₹ भरण्याची तयारी नामदेव समाजोन्नती परिषदेने ठरविले आहे तरी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी विनंती आहे कीं आपले निवेदन खालील व्यक्ती कडे पाठविणे सोबत १)शाळेकडून यंदाच्या यावर्षी इयत्ता १० व १२ वी दाखला
२) गावातील शिंपी समाज बांधवांचे शिफारस पत्र
३)जर कोणी अगोदर फी भरली असेल तरी कळविणे ४)आपल्या पालकांचे बॅक A/C क्रमांक/ गुगल/ स्कॅनकोड वरील बाबीची पुर्तता करणे खालील मोबाईल वर संपर्क साधणे ही विनंती वरील मदत फक्त सोलापूर व बीड जिल्ह्यातील पुरग्रस्त भागातील विद्यार्थी विद्यार्थिनीनाच आहे त्यांनी दिनांक २०/१०/२०२५ पर्यंत संपर्क करणे.
संजयजी नेवासकर अध्यक्ष ना स प राजेंद्र पोरे मुख्य विश्वस्त नामदेव समाजोन्नती परिषद सर्व पदाधिकारी दिगंबर क्षीरसागर 96043 56838 प्रवीण शित्रे 94223 06730 आपली माहिती या मोबाईल वर व्हाट अप कळविणे.आपले सोलापुर जिल्ह्यातील पुरग्रस्त भागातील जास्तीत जास्त विद्यार्थीना कळवुन वरील लाभ घ्यावा.असे इंजि सुनील पोरे नासप सातारा जिल्हा अध्यक्ष यांनी सांगितले आहे.

