पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर पंचायत समिती गणासाठी सोमवारी (दि-13) शेतकी भवन, पंचायत समिती पंढरपूर येथे 16 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.
पंचायत समिती गणासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, निवडणूक नायब तहसिलदार वैभव बुचके यांच्या उपस्थित आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये 16 पैकी 11 जागा विविध प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या असून, 5 जागा सर्वसाधारणसाठी आहेत. या आरक्षणात महिलांसाठी 8 जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, अनुसूचित जाती साठी 2 व मागास प्रवर्गासाठी 2 महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
यामध्ये उंबरे (सर्वसाधारण), करकंब (सर्वसाधारण), भोसे (ना. मा. प्र. महिला), गुरसाळे (सर्वसाधारण), रोपळे (सर्वसाधारण महिला), सुस्ते (अनुसूचित जाती महिला), पुळुज (ना. मा. प्र. महिला), गोपाळपूर (सर्वसाधारण महिला), वाखरी (ना. मा. प्र.), पटवर्धन कुरोली (सर्वसाधारण महिला), भाळवणी (ना. मा. प्र.) पळशी (अनुसूचित जाती महिला), टाकळी (सर्वसाधारण), खर्डी (अनुसूचित जाती), कासेगाव (सर्वसाधारण), सरकोली (सर्वसाधारण महिला) या प्रकारे सोडत काढण्यात आली.