पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
विश्व संवाद केंद्र पुणे, आणि विठाई बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अरिहंत पब्लिक स्कूल, पंढरपूर येथे शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १ या वेळेत माध्यम संवाद परिषद आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी तेज न्यूजला दिली.
यावेळी पत्रकारितेतील विविध विषयावर मार्गदर्शन, तसेच एआय तंत्राचा वापर करून बातम्यांची निर्मिती कशी केली जाऊ शकते याबाबत पुणे येथील या तंत्रज्ञानातील तज्ज्ञ मार्गदर्शिका प्रांजलीताई देशपांडे मागदर्शन करणार आहेत व या विषयावरील कार्यशाळा देखील होणार आहे.
परिषदेनंतर उपस्थित पत्रकारांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे. या कार्यक्रमाला सर्व पत्रकारांनी आवर्जून उपस्थित रहावे. आणि नवीन तंत्रज्ञानाविषयी ज्ञान संपादन करावे ही आग्रहाची विनंती सोमनाथ गायकवाड यांनी केली आहे.

