श्रीक्षेत्र पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सन्मा. सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत साहेब लेखाधिकारी मुकेश आणेचा यांचे उपस्थितीत दिनांक २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर सात दिवस दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत चालू असणाऱ्या नवरात्र संगीत महोत्सवाच पाचव गायन पुष्प ख्यातनाम उदयोन्मुख गायिका सानिका कुलकर्णी यांनी गुंफल.सुरुवातीला सदस्या शकुंतला नडगिरे गायिका सानिका कुलकर्णी, एड.संकेत जोशी,पृथ्वीराज राऊत साहेब लेखाधिकारी मुकेश आणेचा, राजेंद्र सुभेदार,संजय कोकीळ यांचे शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाली.
सुरुवातीला दुर्गा रागामध्ये बंदिश आणि तराणा अप्रतिम गात शास्त्रीय संगीताची सुंदर मेजवानी देत नंतर रुप पाहता लोचणी.भाग्यदा लक्ष्मी बारम्मा,विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, शेवटी कानडा राजा पंढरीचा आणि विठूराया च्या गजराने भक्तीमय वातावरणात सांगता करत अप्रतिम स्वरांनी रसिकांना अक्षरक्ष: मंत्रमुग्ध केले आणि पंढरपूरकरांसाठी ही गानसेवा खास मेजवानी ठरली.त्यांना तितकीच सुंदर साथसंगत निरुपण विघ्नेश जोशी तबला एड. संकेत जोशी हार्मोनियम मानस साखरपेकर पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ माऊली पिसे यांनी करत कार्यक्रमाला रंगत आणली.सुत्रसंचलन ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले.
यावेळी पंढरपूर कला रसिकांनी शेवटपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.पुढे २९ तारखेपर्यंत चालणाऱ्या महोत्सवास उदंड प्रतिसाद देण्याचे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांचे वतीने करण्यात आले.हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती कर्मचारी वर्ग अधिक परिश्रम घेत आहेत