भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून या पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे.
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भाळवणी येथील तलाठी एस एन शिनगारे ,ग्रामविकास अधिकारी डी एस वाघमारे, कृषी सहाय्यक गव्हाणे,डॉ.विनोद एकतपुरे,शेतकरी संदीप पाटील ,सुहास सराटे,विलास पाटील, वैभव लिंगे,व्यंकटेश महाजन,कोतवाल लक्ष्मण गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत.
भाळवणी परिसरातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पचनामे केले जातील अशी माहिती तलाठी शिनगारे यांनी दिली आहे.
यावेळी शेतकरी डॉ.विनोद एकतपुरे म्हणाले की मी पपई पीकाकरीता 2 लाख रुपये खर्च केला आहे.आणि नेमके पिकाच्या वेळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे माझ्या पपई पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. तरी सरकारने जास्तीत जास्त निधी मदत म्हणून शेतकऱ्यांना द्यावा ही अपेक्षा आहे.