पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित अध्यापक विद्यालय येथे हिंदी दिन मोठ्या उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हनुमंत वाघमारे हे होते त्यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या व हिंदी विषय चे महत्त्व जाणून घ्यावे अशा आव्हान केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विवेक वर्धिनी विद्यालयाचे हिंदी शिक्षक राजूभाई मुलाणी हे होते.
यावेळी अध्यापक विद्यालयातील हिंदी भित्तिपत्रकाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले .सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुलांनी यांनी मुलाणी यांनी आपल्या मनोगतात हिंदी विषयाचे महत्त्व सांगितले. राष्ट्रध्वज ,राष्ट्रगीत प्रमाणे राष्ट्रभाषेलाही आपण महत्त्व दिले पाहिजे व हिंदीचा प्रचार प्रसार करावा असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच हिंदीमधील गीत ,काव्य सादर केले.
त्यावेळी व्यासपीठावर हिंदी विषयाचे संतोष गंगथडे सर यांनी विद्यार्थ्यांना हिंदी विषय चे ज्ञान वाढवण्या बद्दल मार्गदर्शन केले.यावेळी प्रास्ताविक मंगेश भुसे यांनी केले तसेच पाहुण्यांचे परिचय शिवानी शिंदे यांनी करून दिला यावेळी विद्यालयातील उषा चव्हाण, अर्पिता कोकाटे, रूपाली चौधरी यांनी भाषणे केली.
यावेळी हरिदास , जाधव ,पाडवी व सर्व शिक्षक शिक्षकेतर पर्यंत उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री रणदिवे व अश्विनी फुगे यांनी केले या कार्यक्रमासाठी अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

