पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
भगवंत विठ्ठल हि कोणाची खासगी मालमत्ता नाही.लढणार आणि अद्दल घडवणार.काल विठ्ठल मंदिरातील भगवंतांच्या गाभार्यात धुप आरती दरम्यान मंदिर समितीच्या एका उच्चभ्रू पदाधिकार्याकडुन भगवंत विठ्ठलाच्या पावित्र्याचा भंग केल्याची माहिती आम्हाला तिथे उपस्थित असलेल्या भाविकांकडुन समजली होती.अशी माहिती रणजीत बागल यांनी तेज न्यूजला दिली आहे.
ती माहिती अत्यंत धक्कादायक होती.याच घटनेची नेमकी सत्यता भाविकांना समजली पाहिजे आणि दुध का दुध पाणी का पाणी समोर आले पाहिजे याच भुमिकेतुन आज मंदिर समिती व्यवस्थापन कार्यालयाकडे कालच्या धुप आरती दरम्यान चे सिसीटिव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.असे रणजीत बागल यांनी सांगितले आहे.
माहिती लवकर उपलब्ध न करून दिल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन व टोकाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील आम्ही यावेळी दिला आहे. भगवंत विठ्ठलाचे पावित्र आम्ही अबाधित ठेवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत.. जर कोणी साक्षात भगवंताशी स्वतःची तुलना करू पाहत असेल त्या प्रवृत्तीला अद्दल घडवण्याचे काम आम्ही करण्यास आम्ही अजिबात पुढे मागे पाहणार नाही.

